*भारतीय वृक्ष लावणे का गरजेचे आहे ?*
भारतीय उपखंडात आढळणारी वड, पिंपळ,कडुनिंब, उंबर, नारळ, इत्यादी यासारखी शतायुषी झाडे. देशी आणि विदेशी वृक्ष असा जेव्हा वाद घातला जातो, तेव्हा हमखास केला जाणारा युक्तिवाद म्हणजे, विदेशी झाडे सावली देत नाहीत का? ती ही झाडेच आहेत मग त्यांचा काहीच उपयोग नसतो का? असे प्रश्न उपस्थित केले जातात. प्रत्येक जिवंत झाड हे झाडच असते, मात्र त्याचा स्थानिक पर्यावरणाला आणि त्यात असणार्या जैवविवीधतेला कितपत उपयोग होतो, हे पाहणे गरजेचे ठरते. वृक्षारोपण करताना आणि देशी झाडे लावणे योग्य कि विदेशी झाडे लावणे, या 'देशी' शब्दाची साधी व्याख्या म्हणजे 'स्थानिक' अशीही होऊ शकते. या खंड निर्मितीदरम्यान निर्माण झालेल्या भौगोलिक सीमा विविध प्रकारच्या नैसर्गिक बदलांना कारणीभूत ठरल्या. पुढे वेगवेगेळे झालेले खंड, आपापल्या सीमांमध्ये वेगवेगळी जैवविवीधता (बायोडायव्हर्सिटी) जोपासत समृध्द होत गेले. तिथल्या स्थानिक पर्यावरण, हवामान आणि भौगोलिकतेप्रमाणे या समृध्दतेची जोपासना होत गेली. हे स्थानिक हवामान आणि त्याच हवामानात जन्माने एकमेकांना पूरक बनलेली ही जैवविविधता दुसऱ्या खंडात नेऊन रुजवायचा...