*आता देशी झाडेच का लावायची ?* 🌳🌲🌱
*अश्वत्थमेकंम पिचुमंदमेकं न्यग्रोधमेकं दशचिंचिणीकम।*
*कपित्थबिल्वा मलकत्रयं च पंचाम्रवापी नरकं न पश्येत्।*
म्हणजे पिंपळ, कडुलिंब आणि वड यापैकी एक वृक्ष आणि चिंचेची दहा झाडे किंवा कवठ, बेल आणि आवळा यापैकी कोणत्याही जातीचे तीन वृक्ष आणि आंब्याची पाच झाडे जो लावेल, तो नरकात जाणार नाही.
हे आपल्याला पुराणात सांगून ठेवलेलं आहे. वडाला, उंबराला देवाचा दर्जा दिला गेलाय.
देशी वृक्ष आपल्या जंगलात किंवा स्थानिक हिरव्या पट्टयात पर्यावरणाचा समतोल सांभाळत असतात. त्यांच्या अस्तित्वाशी जुळवून घेतलेली, व त्यावर जोपासली जाणारी सजीव व्यवस्था तयार झालेली असते.
या सजीव व्यवस्थेत मनुष्य, प्राणी, पक्षी, असे अनेक जीवजाती सामावलेले असतात. पक्ष्यांना, किडयांना आणि कीटकांना अन्न तसेच निवारा मिळतो.
या देशी वृक्षांच्या गळलेल्या पानांतून जमिनीवर जमणाऱ्या पाला- पाचोळयापासून तयार होणाऱ्या खतातून जमिनीचा कस वाढत असतो. आणि या विघटन झालेल्या पालापाचोळयाच्या खतातून निर्माण होणारी पोषकद्रव्ये पुन्हा झाडाकडे पाठवण्याचे काम झाडांची दूरवर पसरणारी मुळे करत असतात व ती खोलवर जाऊन ती जमिनीवरच्या मातीलाही धरून ठेवतात. विविध कीटकांना, किडयांना आणि सरपटणाऱ्या जीवांना अशी जमीन खुप उपयुक्त ठरते आणि एक परिपूर्ण असे पर्यावरण निर्माण करते. आणि त्याचमुळे ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. पावसाचे प्रमाण वाढते. ढगांना पाऊस पाडण्यासाठी आवश्यक असलेला गारवा निर्माण करण्याची क्षमता आपल्या देशी वृक्षां मध्ये असते. त्यांचे प्रमाण कमी झाल्याने अवकाळी पाउस, उन्हाळा, पावसाला, थंडी यांचे चुकलेले चक्र आपल्याला वेगाने विनाशाकडे घेवून जात आहे.
देशी वृक्षांच्या फांद्या, ढोल्या या विविध प्रकारच्या प्राणी व पक्ष्यांचा निवारा असतात. वटवाघळे 350/400 पेक्षा जास्त प्रकारच्या झाडांचे निसर्गात रोपण करीत असतात. यात वड, उंबर, आंबा, जांभूळ, चिकू, बोर, मोहा, सीताफळ, रामफळ अशी अनेक फळझाडे असून सर्वात अगोदर फळ पिकलेले वटवाघळाला समजते.
पाडाला पिकत आलेला आंबा सुरुवातीला वटवाघळे खातात आणि मग शेतकरी आंबे उतरवतात व नंतर पिकत घालतात. ही एक परिपूर्ण सायकल आहे.
मुक्या प्राण्यांना हे कळत असेल तर मग माणसाला कधी कळणार?
पांगारा, सावर, कडुनिंब, करंज, बहावा, वड, पिंपळ, उंबर, चिंच, कोकम, आपटा, कांचन, बहावा, कदंब, फणस ,आवळा ,आंबा , सिताफळे, जांभळ, कवठ, बेल, कडुनिंब ,मोह, पळस ही झाडे न लावता निव्वळ फोटोसाठी चुकीचे वृक्षारोपण करणाऱ्या लोकांना थांबविणे गरजेचे आहे. अन्यथा वृक्षारोपण होईल, वृक्ष वाढतील, पण जैवविविधता जोपासणार नाही. परिसंस्था तयार होण्यास मदत होणार नाही. हे लक्षात घ्यायला हवे.
Comments
Post a Comment