*वृक्ष मित्र*
54 कोटी वर्षांपूर्वी जैवविवीधतेचा महाविकास 'कॅम्ब्रियनकल्पामधील विविधतेचा स्फोट ' या नावाने ओळखला जातो. बहुपेशीय सजीवांमधील सर्व संघाची निर्मिती झालेली होती. त्यांपुढील 40 कोटी वर्षामघ्ये जैवविवीधते चा पुन्हा पुन्हा नाश झालेला होता. ' कार्बोनिफेरस' युगामघ्ये सदाहरित वनामधील वनस्पती व सजीवांचा नाश झाला.
'पर्मियन ट्रायसिक' युगामघ्ये 25 कोटी वर्षांपूर्वी झालेला जैवविवीधतेचा नाश सर्वात मोठा होता. साडेसहा कोटी वर्षांपूर्वी झालेला जैवविवीधते चा 'क्रिटेशियस टर्शरी विनाश' हा नजीकच्या काळातील नाश होय. याच काळात डायनोसॉर नष्ट झाले.
तीन कोटी वर्षांपूर्वी सजीवांनी पुन्हा एकदा जम बसविला. जैवविवीधतेमध्ये मानवाचा प्रवेश झाल्यानंतर जैवविवीधता आणि जनुकीय विविधता हळूहळू नाहीशी होते, त्याला 'हाॅलोसिन विनाश' असे बोलले जाते. मानवी हस्तक्षेपामुळे अधिवास नष्ट झाल्यामुळे जैवविवीधते चा नाश होत आहे.
संयुक्त राष्ट्र संघातर्फे जैवविवीधतेच्या नाशाकडे लक्ष देण्यासाठी इ.स.2011 ते 2020 हे दशक जैवविवीधता दशक म्हणून जाहीर केले आहे
इ.स.1968 मध्ये राउंड एफ दासमान या वन्यजीव अभ्यासकाने जैवविवीधता या शब्दाचा प्रथम प्रयोग केला. हा शब्द त्यांनी ' अ डिफरंट काइंड ऑफ कंट्री ' या सामान्य वाचकासाठी लिहिलेल्या पुस्तका मध्ये विविधता टिकवून ठेवण्याच्या संदर्भात वापरला.
पुर्वीच्या काळी घराच्या आजूबाजूच्या परिसरात वेगवेगळ्या फळे, फुलांची, भाज्या अशी झाडे लावली जात जेणेकरून पक्षी, फुलपाखरू व इतर सजीवांची परिपूर्ण साखळी तयार होई पण सध्याच्या परिस्थितीत काँक्रिटीकरणामुळे ही साखळी टूटत चालली आहे.
जैवविवीधता किंवा जैविक विविधतेचे अनेक अर्थ निधतात. सामान्य पणे जैवविवीधता म्हणजे जाति विवीधता आणि त्याच्या मधील संपन्नता आणि परिसंस्थेतील विविधता, आणि जनुकीय विविधता.
जैवविवीधता पृथ्वी वर सम प्रमाणात पसरलेली नाही. एवढेच नाही तर एकाच प्रदेशात सुध्दा सारखे पणा आढळून येत नाही. सजीवां मधील विविधता, तापमानावर, पडणार्या पावसाच्या प्रमाणावर, समुद्र सपाटी पासूनच्या उंचीवर, भूप्रदेशाच्या गुणधर्मावर, आणि सभोवतालच्या सजिवांच्या अस्तित्वावर अवलंबून असते.
सदाहरित जंगलात होत असलेली वृक्ष तोड, लोकसंख्या वाढ, डोंगरातले खाणकाम, हवा प्रदूषण, माती प्रदूषण, जल प्रदूषण, आणि जागतिक तपमानात होणारी वाढ या सर्वांचा अधिवास बदलाशी संबंध येतो. अधिवासात असणार्या जातींची संख्या त्याच्या क्षेत्रफळावर अवलंबून असते. मोठ्या आकाराचे जाती व समूद्रसपाटीलगत असणार्या जंगलातील जाती अधिवासात बदलास संवेदनशील असतात. दक्षिण भारतातील सलग जंगलाचा पट्टा नाहिसा झाल्यामुळे जंगलातील हत्ती उन्हाळ्यात पीकांमध्ये धूसतात, त्याना ते नैसर्गिक खाद्य वाटते आणि हुसकावून लावले तरी परत परत येत राहतात.
जेव्हा मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होते आणि परत वृक्षारोपण केले जाते तेव्हा पूर्वी अस्तित्वात असलेल्या सर्व वनस्पती परत कधीच लावता येत नाही. आणि एकाच प्रकारच्या वृक्षारोपण केल्यामुळे त्या परिसरातील असलेली विविधता नष्ट होते.
जैवविवीधता आणि जनुकीय विविधता यांचा परस्पर संबंध आहे. जातीमधील विविधतेसाठी जातींमधे जनुकीय विविधता असणे आवश्यक आहे. एका धटकाचा अभाव म्हणजे दोन्ही मधील संतूलन संपणे. अशा वेळी एकच जाती त्या परिसरात प्रबळ ठरते. पाळीव प्राण्यावरून हे सहज लक्षात येते, जसे पशुपालनासाठी राखीव कुरणे म्हणजे फक्त दूध किंवा मांस साठी जनावरं पाळणे आणि उत्पादन धटण्याच्या भितीने दुसरी वनस्पती वाढू दिली जात नाही.
आधुनिक युगाचा सुमारे 11,000 वर्षांपूर्वी प्रारंभ झाला. इ.स.पू.10,000 मध्ये कृषी व्यवस्थेचा प्रारंभ झाल्यापासून परिसर मध्ये अवजारांच्या मदतीने बदल करून नैसर्गिक अधिवास मानवास राहण्यायोग्य बनवणे हे आधुनिक युगाचे वैशिष्ट्य. मानवी हस्तक्षेपा मुळे सध्या विलोपण क्रिया एवढी झपाट्याने होत चालली आहे कि येत्या शंभर वर्षांत काही सजीवांचा नाश होण्याची शक्यता आहे.
चला तर , आपल्या आजूबाजूच्या परिसरात वेगवेगळ्या देशी झाडांची, आणि कमीत कमी फळे फुलांच्या जातीच्या वृक्षारोपण करून झाडांचे संरक्षण आणि संवर्धन करूया. जैवविवीधता राखण्यासाठी हातभार लावू, ही केवळ सरकारची जबाबदारी नाही हे निश्चित लक्षात घ्यायला हवे. जर प्रत्येक नागरिकांनी प्रयत्न पुर्वक फक्त जरी आपल्या परिसराचे रक्षण केले, तरी फार मोलाचे योगदान होवू शकते. त्यासाठी आपण आपली जाणीव पूर्वक जीवनशैली बदलली पाहिजे.
Comments
Post a Comment