*वैश्विक कुटुंबियांची भूमीका*

*वैश्विक कुटुंबियांची भूमीका* टिम महाइकोसीस ने कामाचे पारंपारिक परिमाण बदलवून गरजूंना तातडीने मदत करण्याचे कार्य स्विकारले आहे. ह्या कार्यात सक्रिय आणि भरीव योगदान देत उल्लेखनीय कार्य केले आहे. ही मदत कष्टाचे चीज करणारी मातृत्वाची परिमाण ठरली आहे. लॉकडाऊमुळे पायी, सायकल, मिळेल त्या गाडीने जाणाऱ्या अनेक मजुरांच्या रांगा रस्त्यावर जात आहेत. मुलं, बायका- माणसे, पोत्यामध्ये भरलेला छोटासा संसार घेऊन तीनशे-चारशे किलोमीटर गावी जाण्यासाठी निघालेल्या या कुटूंबांना जेवण्याची व्यवस्था करावी म्हणून टिम महाइकोसीस व निलेश भगत यांचे अमरावती मधले सहकारी यांनी पुढाकार घेतला. मसाला खिचडी व लहान मुलांना बिस्किट्स यांसोबतच भर उन्हात निघालेल्यांचा घसा कोरडा पडू नये आणि शक्ती यावी त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था ठेवली आहे. या संकटकाळात आता पर्यंत अगणित लोकांना जेवण पुरवून सामाजिक बांधिलकी जोपासत कर्तव्य निभावले आहे, आणि असे कार्य अखंड दिवसरात्र चालू आहे व चालू राहील. ह्या कार्यात निलेश भगत, सुनिल खुपसे, नुपेशसिंह ठाकुर, प्रविण लोखंडे, सचिन खेडकर, चंद्रशेखर खुपसे, गोपाल तानवैस, कुंदन खुपसे, रवी खुपसे, सचिन गाळे. ह्याचे सक्रिय सहभाग व सहयोग आहे. आमच्या संस्थेच्या ह्या उपक्रमात अनेकांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अनमोल मदत केली आहे. शिवाय दिवसेंदिवस मदतीला येवून मिळणारे समर्थ हात मदत करणार्या हातांना बळकटी देणारे आहेत. आणि या उपक्रमात अनेक देवदूत बनून अनेकांनी भरीव योगदान दिले आहे त्याबद्दल धन्यवाद! तसेच पोलिस अधिकारी व स्टाफ कडून आमच्या उपक्रमात सहभाग, मार्गदर्शन, व अतिशय सहकार्य लाभले, आणि नेहमीच असे सहकार्य मिळत राहील अशी आशा आहे. ह्या समर्थ मदतीच्या हातांची दखल घेत आहोत. तसेच सामाजिक भान जपत गरजूंना सर्व दूर मदत करीत 'वैश्विक कुटुंबियांची' भूमीका बजावली आहे. समाजकार्यासाठी नेहमीच तत्पर असलेल्या टिम महाइकोसीसचे निलेश भगत आणि टिम यांचे कौतुक आहे. *टिम महाइकोसीस* मीना जाधव. निलेश भगत.