आयुष्यात वृक्ष किती महत्वाचे आहेत या जाणून धेवू...
एका कुटुंबातील चार सदस्यांसाठी एका वर्षभरात जितक्या ऑक्सीजनची आवश्यकता असते तितका ऑक्सीजन एक झाड एक वर्षात तयार करते. सरासरी 12 किलो ग्रॅम कार्बनडाय ऑक्साइड शोषून घेते.
झाडांनी कार्बनडाय ऑक्साइड शोषून घेतल्यामुळे वातावरण स्वच्छ होते. वृक्ष माणसा मध्ये आनंद व उत्साहाची भावना निर्माण करतात. मनाला शांतता मिळते, मनावरील तणाव कमी होतो.
वृक्ष हे एक बॅरिअरचे भुमिका बजावतात. ध्वनी प्रदूषणाला नियंत्रीत करण्याचे काम करतात.
जगभरात सध्या जलवायू परिवर्तनाचे संकट आहे. ग्रीन हाऊस मधून अत्याधिक प्रमाणात वायू उत्सर्जित होत असल्याने जगासमोर हे संकट उभे राहिले आहे असे तज्ञांचे मत आहे. आणि म्हणूनच वैश्विक तापमानात सातत्याने वाढ होत आहे, पर्यावरणाचे चक्र बिघडते आहे.
2020 पासून ह्याचे भयानक परिणाम दिसू लागतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जलवायू परिवर्तनाच्या विनाशकारी परिवर्तनापासून वाचविण्यासाठी जनजागृती निर्माण होणे फार महत्वाचे आहे.
*जाणून घ्या धोक्याचा इशारा वेळीच उपाय योजना करा*
जगभरातील मोठी लोकसंख्या समुद्र किनारी वास्तव्य करते आणि त्यांना सगळ्यात जास्त धोका आहे, तापमान वाढीच्या दुष्परिणामांनाला सर्वात प्रथम याच लोकांना सामोरं जावं लागणार आहे.
पृथ्वी भोवती संरक्षण कवच असलेल्या ओझोन थरात 10 टक्के धट झाल्यास कॅन्सर होण्याच्या शक्यतेत 50 टक्के वाढ होऊ शकते. त्यामुळे पर्यावरण वाचविण्यासाठी जास्त वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे.
पाण्यालाही स्वच्छ ठेवण्याचे काम वृक्ष करत असतात. पावसाच्या पाण्याचा प्रवाह हळूवार करून ते पाणी गाळण्याची प्रक्रिया ही झाडाकडून होत असते. झाडांची मूळे मातीला घट्ट धरून ठेवण्याचे काम करत असतात. पावसाच्या पाण्यामघ्ये माती वाहून जाण्यास मुळे प्रतिबंध करतात.
एकूणच जागतिक तपमानात सतत होणारी वाढ लक्षात धेता आता पासून ठोस पावले ऊचलणे गरजेचे आहे. जगातील अनेक देशांनी तसे प्रयत्न ही चालू केले आहेत.
'बिलियन ट्रि' अभियानात भारता सह अनेक देशांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. या अभियाना अंतर्गत वृक्षारोपण मोहीम राबविणार्या देशांच्या यादीत आठव्या क्रमांक वर आहे. पहिल्या क्रमांकावर पोचण्यासाठी तुमच्या आमच्या सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. गेल्या काही वर्षात भारतात झाडांचे जितकं नुकसान झाले आहे, त्याची नुकसान भरपाई करण्यासाठी 130 मिलियन हेक्टर वृक्ष लागवड, संगोपन व संवर्धन करणे आवश्यक आहे. आणि म्हणूनच सामाजिक बांधिलकी जोपासत 'महाइकोसीस' एक लाख वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला आहे. या कामी पुढाकार घेऊन रोपे उपलब्ध करून दिली आहे आमच्या या कार्यात आपणही सहभागी व्हा जास्ती जास्त वृक्षारोपण करून मोहीम राबविण्यात मदत करा... कारण हीच वेळ उत्तम आहे वृक्षारोपणासाठी...
आपल्या देशाच्या एकूण भूमी पैकी फक्त 11टक्के भाग जंगलाने व्यापलेला आहे. मोठ्या प्रमाणावर होणार्या वृक्ष तोडीचे पर्यावरण वर फार परिणाम होवून कुठे दुष्काळ तर कुठे पूर परिस्थिती निर्माण होते आहे. आणि म्हणूनच वृक्ष लागवड, संगोपन व संवर्धन करणे पर्यावरण वाचविण्यासाठी गरजेचे आहे.
Comments
Post a Comment