*कर्तव्याची परिनिष्ठा*





*"महा इकोसीस"
'महाराष्ट्र इकोसीस्टम'* 
परिसंस्थेच्या पुनरुज्जीवनासाठी एक पुढाकार प्रत्येक नागरिकांच्या समर्थनासह पर्यावरणीय प्रणाली पुन्हा तयार करण्याचा एक अभिनव मार्ग. 
आमचा मुख्य उद्देश परिसंस्थेचे पुनरुज्जीवन करणे आहे. परंतू आता जगावर आलेल्या कोवीड19 विषाणुच्या संकटातून जात असताना आपले प्रथम कर्तव्य आहे कि ह्या परिस्थितीतुन बाहेर पडण्यासाठी एकमेकांना मदत करण्यासाठी प्रयत्न करणे. आणि म्हणूनच टिम महाइकोसीस सज्ज झाली आहे, प्रयत्न करत आहे.
 *महाइकोसीस* चे संस्थापक मीना जाधव आणि निलेश भगत आणि टिम महाइकोसीस आम्ही सदैव जागरूकता दाखवत समाज बांधिलकी जोपासत आहे. 
 संचारबंदी मुळे गुजरात मघील झारखंडचे स्थलांतरीत कामगार व त्यांचे कुटुंबिय मूळ गावी झारखंड राज्यात खाजगी बसने निघाले होते. जात असताना अमरावती येथील रहाटगाव येथे पोचली, तेव्हा अचानक 27 वर्षीय महिलेची बस मघेच प्रसूती झाली. पुढील उपचारासाठी त्यांना हाॅस्पिटल मघे जाणे गरजेचे होते. त्याचवेळी रहाटगाव येथे चौकात सद्य परिस्थिती मघे या रस्त्याने जाणार्या वाटसरूंना सातत्याने सेवा देणारे, त्यांच्या जेवनाची व पाण्याची व्यवस्था करत असलेले महाइकोसीसचे निलेश भगत आणि सुनील खुपसे व त्यांचे सहकारी, अन्न वाटप करत असताना तिथे बस येवून थांबली, त्या बस मधील इतर नातेवाईकांनी सांगितल्यावर यांच्या सर्व प्रकार लक्षात आला, प्रसंगाचे गांभीर्य ओळखत क्षणाचाही विलंब न करता निलेश भगत यांनी स्वतः बस प्रथम पीडीएमसी रूग्णालयात आणली... परंतु तिथे पीपीई किटची सोय नसल्याने डाॅक्टरनी महिलेला डफरीन रूग्णालयात घेवून जाण्यास सांगितले. त्यानंतर बाळबाळंतीला डफरीन रूग्णालयात दाखल केले, डफरीन च्या डाॅक्टरनी तत्परता दाखवत बाळ व बाळंतिणीवर उपचार केले. इथेच न थांबता ट्रॅव्हल्स मघील सर्वांची जेवनाची व्यवस्था करून त्यांची सुखरूपपणे पुढील प्रवासास रवानगी केली. निलेश भगत, सुनील खुपसे व टिम महाइकोसीस ने प्रसंगावधान दाखवून एका बाळ-बाळंतिणीचे जीव वाचवण्याचे अनमोल कार्य केले आहे. त्यांच्या कार्याला सलाम!

Comments