About us


"महा इकोसीस"
'महाराष्ट्र इकोसीस्टम'
परिसंस्थेच्या पुनरुज्जीवनासाठी एक पुढाकार.
प्रत्येक नागरिकांच्या समर्थनासह पर्यावरणीय प्रणाली पुन्हा तयार करण्याचा एक अभिनव मार्ग.
An innovative way to recreate Ecological system with support of each and every citizen.
संस्थापक :- मीना जाधव.


निसर्गातील अन्नसाखळी, 
बि -बियाणे, प्राणी व पक्षी, फुलपाखरे आणि परागकण याची माहिती अनेकांना नसते, म्हणून वृक्ष संमेलन धेण्याची संकल्पना सुचली आहे. तीनचार वर्षांपासून असे संमेलन घेण्याचा विचार करत आहे. मागील काही दिवसांपासून हा वृक्ष संमेलन चा विचार मनात आकाराला आला आहे. पण त्याला मूर्त रूप कसे द्यायला हवे ह्या साठीचा विचार विनीमय.

वृक्ष लागवड, वृक्ष ओळख, बियाणे आणि पर्यावरणासाठी वृक्षांची आवश्यकता यावर अनुभवी पर्यावरणप्रेमींनी बोलावे. पर्यावरण अभ्यासक तेथे असावेत. त्यांनी आपले विचार मांडावेत, जेणेकरून  पर्यावरण आणि वृक्ष लागवड याचे महत्त्व सगळ्यांना  समजेल.

जंगलसंपदा अतिशय कमी झाली आहे, म्हणून  अशा संमेलनातून जर वृक्ष लागवडीला चालना मिळाली, तर निश्चितपणे येणाऱ्या काही वर्षांत असे भाग दुष्काळमुक्त होण्यास मदत होऊ शकेल असे वाटते. आणि त्याच्या फायदा  सजीव सृष्टीला होईल. तसेच झाडे लावणे इतकाच संकोचित विचार न करता प्रत्येकाने  पर्यावरणाच्या रक्षणासाठी  पुढाकार घेतला पाहिजे. झाडांमुळे मिळणाऱ्या शुध्द हवेचे महत्त्व लक्षात घेऊन वृक्षलागवड करून ती जगवावीत, आपल्याला  झाडाशिवाय आहेच कोण? जे शुध्द  हवा फ्री देवू शकतील.

विविध जातीच्या  वृक्षांची  ठिकठिकाणी लागवड केल्यावर  काही दिवसात हा ऑक्सिजन झोन तयार होईल, शिवाय तज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शन  मिळाले तर योग्य ठिकाणी योग्य झाडे लावली, जोपासली तर त्याबरोबर वाढणारे पशूपक्षी-जिवजंतू असे एक परिपूर्ण  सायकल  तयार करता येईल. असा उद्देश समोर ठेवून काम करणारे, त्यासाठी धडपड करणारे, त्यांना उत्तम  प्रोत्साहन  देणारे अशा  सर्वांना एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे हा एक मुख्य उद्देश संमेलनाचे आहे.

झाडांमुळे मिळणाऱ्या शुध्द हवेचे महत्त्व लक्षात घेऊन झाडे जगवण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहन करावे लागेल. हे संमेलन अधिक प्रभावी करण्यासाठी शासन आणि लोकांच्या सहभागातून ही चळवळ उभी करावी हा उद्देश आहे.

Popular Posts