*देशी, जंगली झाडांची बियाणे गोळा करण्यासाठी मदत करण्यासाठीचे आवाहन* 🌱🍒 *नम्र विनंती*🍒🌱


कोरोना साथीमुळे आपण बाहेर पडू शकत नाही, आणि सध्याचा काळ हा बिया मिळण्याचा आहे. 'महाइकोसीस' ह्या संस्थेच्या माध्यमातून देशी बिया गोळा करून त्याचे वाटप, सिडबाॅल बनवून लागवड व त्याची रोपे बनवून समाजातील सर्व लोकांना जे त्यांचे जतन करतात व लागवड करतात, त्यांना मोफत वाटप करतो. तसेच ग्रुपतर्फे वृक्ष लागवड करून वृक्ष संगोपन व संवर्धन केले जाते. 
 ह्या वर्षी लॉकडाऊनमुळे आम्ही बाहेर पडू शकत नाही पण तुम्ही जर गावी, दूरवर असाल तर काळजी घेऊन बियाणे जसे की पळस(लाल, पिवळा), कदंब, खैर, अर्जून, कांचनार, डिकेमली, टेटू,पाडळ, बकनीम, बकूळ, महारूख (महानिंब), शिरस, शिवन, सटविन, हिंगनबेट, पांगारा, काटेसावर, धामण, हिरडा, बेहडा, सीता अशोक, ताम्हण, करमळ, बिब्बा, आपटा, चारोळी, बाभुळ, बोर, आंबा, जांभूळ, रिठा, अजाण, बकुळ, बीजा, बेल, भोकर, बिट्टी, चिंच, धावडा, घटभोर, माकडलिंबू, मोई, सालई, कवठ, करंज, शिरीष, खैर, नेवर, मुचकुंद, अंबुळकी, तोरण, पांढरूक, पाडळ, जांभूळ, कुंकूफळ, कोकम, शिकेकाई, कुसुम्ब, कुंभ, वरून, कडुलिंब, महारुख, मेंढशिंगी, खडशिंगी, काकड, काळा कुडा, पांढरा कुडा, कळम, जंगली बदाम, हेंकळ, रतनगुंज, शेंद्री, घोळ/खिरणी, टेटू, उंडी, तुती, मोखा, बकानानिंब, तेंदू वगैरे गोळा करून वेगवेगळे आम्हांला द्यावेत ही नम्र विनंती. गोळा करून ठेवा आणि आम्हांला कळवा. लोकडाऊन नंतर ठरवू कसे तुमच्या कडून घेऊन यायचे ते. 
विना सहकार नही उद्धार! 
एकमेकांच्या सहाय्यानेच पर्यावरण संवर्धन होईल आणि आपण सर्वजण येणाऱ्या जागतिक तापमानवाढ, कार्बन उत्सर्जनावर मात करू शकू.  
आपले निसर्गमित्र,
 *महाइकोसीस* 
*महाराष्ट्र इकोसिस्टम* 
(पतसंस्थेच्या पुनरुज्जीवनासाठी एक पुढाकार) 
बियाणे देवान-घेवान करीता या नंबर वर संपर्क साधावा. 8208707426/9860722228/9890310439

Comments