वृक्ष संगोपन व संवर्धन संमेलन चळवळ.
वृक्ष संमेलन मधे घेतले जाणारे विषय :-
ह्या संमेलन मध्ये वड, पिंपळ, औदुंबर, कडुनिंब, तुळश अध्यक्ष असणार आहे.
संमेलनाला पर्यावरण तज्ज्ञ उपस्थित राहवे, तज्ञांची भाषणे (मार्गदर्शन) व्हावी.
वृक्षारोपणानंतर येणार्या अडचणी, आग लागली तर किंवा लागू नये म्हणून उपाय योजना काय करता येईल ह्यासाठी चे मार्गदर्शन. हवेतील प्रदूषण, पर्यावरणाचा ढासळणारा तोल ह्या वर उपाय.
वृक्ष प्रेमी, विद्यार्थी, शासन व सामान्य नागरिक सहभागाने तरूणपिढीमध्ये वृक्ष प्रेम निर्माण करणे हे उदीष्ट. निसर्गाचा आपणही काही देणं लागतो, हा संस्कार लहानपणापासून मुलांवर होण्यासाठी विविध शाळांमध्ये जावून मार्गदर्शन, व ही माहिती मनोरंजक पद्धतीने पोहचवण्यासाठी ग्रुप तयार करून कार्य करावे लागेल, निबंध स्पर्धा, वकृत्वस्पर्धा, डिबेट आयोजन करावे लागेल.
'विकास' करण्याची धाई झालेल्या काही जणांना त्याच्या तात्कालिक फायदे दिसतात पण भविष्यात होणार्या पर्यावरण हाणीच्या परिस्थितीची जाणीव नसते ती करून देवून योग्य असे मार्ग अवलंबले पाहिजे.
*झाडांची ओळख, माहिती, उपयोग; वन्यजीवांजंतू, पक्षी यांची माहिती
*जागतिक दिवसांची माहिती असे विषय धेवून दिनदर्शिका.
Comments
Post a Comment