निसर्ग मनुष्याचा प्रथम गुरू आहे


निसर्गाची शाळा ही मुक्त  शाळा आहे
जो जे अनुभव  धेईल तसे तो समृद्ध  होत जाईल  असे माझे प्रामाणिक मत आहे
 मानव वन्यजीव  संघर्ष हा मानवाने निसर्गाशी सहजिवन तोडून स्वतः आमंत्रित केला आहे.
 माझ्या मते निसर्ग आणि मानवामघ्ये दुरी  निर्माण झाल्यामुळे 
एकीकडे लाखो वन्यजीव मरत आहेत आणि त्याचबरोबर  मनुष्य ही आपले प्राण गमवत आहे.
 आज आपण सर्व जीवनाच्या अशा वळणावर आहोत की भविष्यात काय वाढून ठेवले आहे याची कल्पना करवत नाही. युरोप व इतर देशांत सध्या जे घडत आहे हे पाहून काळजाचा ठोका चुकेल अशी  महाभयंकर  परिस्थिती निर्माण झाली आहे. ह्या महाभयंकर अशा परिस्थितीतून सही सलामत बाहेर पडल्यावर पर्यावरणाला हानी न  पोहोचवता जगू अशी प्रतिबंधात्मक उपाय योजना करावी लागेल. शहरी चंगळवादी संस्कृतीला आवर घातला पाहिजे. कोणी थेट भासवत नसलं तरी प्रचंड दडपणाखाली सर्व जण वावरत आहेत. तरीही सर्वांनी मिळून ठरवले तर काही ही अशक्य नाही, गरज आहे सर्वांनी मिळून  एकत्रित कृती करण्याची. सर्वांनी मिळून मनावर घेतलं आणि एकजूट दाखवत धाडसाने भविष्यात आपल्या पूढे वाढून ठेवलेल्या समस्येवर सक्षमपणे सामना करू शकू.

Comments